संजीवनी निवृत्ती खोत |
वझरेपैकी खोतवाडी (ता. आजरा) येथील सौ. सुशिला व निवृत्ती विष्णू खोत यांची कन्या कुमारी संजीवनी निवृत्ती खोत हिने मे २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंट (C. A.) या परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. आई-वडिलांच्या कष्ट तीने सी. ए. होवून सार्थकी लावले.
तीन वर्षापूर्वी खोत कुटुंबीय काम धंद्यासाठी मुंबईला गेले. उदरनिर्वाहासाठी काम करण्याशिवाय पर्याय नसल्याने त्यांनी ठाणे येथे भाजी व्यवस्था सुरु केला. तो आजही सुरु आहे. व्यवसाय करत त्यांनी मुला-मुलीमध्ये भेदभाव न करता मुलीला कष्टाने शिकविले. दोन-तीन वेळा यशाने हुलकावणी दिली. मात्र जिद्द व मेहनतीच्या जोरावर आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत संजीवनी सी. ए. झाली. पुढील शिक्षणासाठी ती लंडनला जाणार आहे. एम. कॉम मध्ये तिने `अर्थशास्त्र व वित्त` या विषयावर मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळवले आहे. तिच्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आपल्या यशाचे श्रेय ती आई, वडील, भाऊ व कुटुंबीयांना देते. सुवर्णपदक विजेते चंदगडचे वनपाल दत्ता पाटील यांची ती भाची आहे.
No comments:
Post a Comment