ध्येय निश्चित करुन आत्मविश्वासाने अभ्यास करा - पीएसआय वैशाली हन्नुरकर, मजरे कारवे येथे सुप्रिया गवसेकर हिचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

09 July 2023

ध्येय निश्चित करुन आत्मविश्वासाने अभ्यास करा - पीएसआय वैशाली हन्नुरकर, मजरे कारवे येथे सुप्रिया गवसेकर हिचा सत्कार

मजरे कारवे येथे सत्कार समारंभाला उपस्थित मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        ध्येय निश्चित करून भिती न बाळगता आत्मविश्वासाने अभ्यास करा असे आवाहन नूतन पीएसआय वैशाली हन्नुरकर हिने केले. मजरे कारवे येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत आयोजित सत्कार समारंभात ती बोलत होती. अध्यक्षस्थानी पत्रकार निंगाप्पा बोकडे होते. 

       तसेच डब्लूआरडी या स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या सुप्रिया गवसेकर म्हणाल्या की, अभ्यास नेटके नियोजन केल्यास यशाला गवसणी घालणे सोपे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गवसेकर व हन्नुरकर यांनी आपल्या स्पर्धा परीक्षेतील अनुभवाचे कथन केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना पत्रकार निंगाप्पा बोकडे म्हणाले की, तालुक्यात निंदा करणारे लोक असले तरी त्याहीपेक्षा यश मिळाले की पाठ थोपटणारे लोकही कमी नसल्याने निंदा नालस्तीकडे दुर्लक्ष करून अभ्यास करा, करा असे आवाहन त्यांनी केले. 

       तत्पूर्वी अभ्यासिकेचे संचालक मनोज जांबोटकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल वैशाली हन्नुरकर हिचे, डब्लूआरडी परीक्षेतील यशाबद्दल सुप्रिया गवसेकर व आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल निंगाप्पा बोकडे यांचा सत्कार करण्यात आला. अभियंता मकरंद पाटील याने सूत्रसंचलन केले तर महेश जांबोटकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment