दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आमची कार्टूनगिरी ' भित्तीपत्रकाचे उद्घघाटन - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2023

दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आमची कार्टूनगिरी ' भित्तीपत्रकाचे उद्घघाटन

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आमची कार्टूनगिरी ' भित्तीपत्रकाचे उद्घाघाटन मुख्याद्यापक एन. डी. देवळे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुलांचा बराचसा वेळ कार्टून बघण्यातच जात असतो. अशा कार्यक्रमांचा मुलांच्या वर्तनावर परिणाम होत असतो. मुले कार्टूनची भाषा बोलण्याचा प्रयत्न करत असतात. इ. नववीच्या विद्यार्थ्यांनी ' आमची कार्टूनगिरी' या भित्तीपत्रकाची तयारी केली.एकूण तीस मुलांनी कार्टूनची चित्रे काढली होती.मुलांच्या कला कौशल्याला चालना देण्यासाठी अशा उपक्रमाची आवश्यकता आहे. या विद्यार्थ्यांना संजय साबळे यांचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला टी. एस. चांदेकर, एम. व्ही. कानूरकर, शरद हदगल, टी. टी. बेरडे, डी. जी. पाटील, सूरज तुपारे आदि . उपस्थित होते.


No comments:

Post a Comment