चंदगड पोलिसांकडून ३५ हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

17 July 2023

चंदगड पोलिसांकडून ३५ हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    पावसाळी   पर्यटनाच्या नावाखाली मद्यधुंद अवस्थेत नंगानाच घालत आंबोलीला जाणार्या ३५ पर्यटकांवर आज चंदगड पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून १३हजार ३०० रूपये दंड वसूल केला.

 बेळगाववरून आंबोलीला जाणाऱ्या पर्यटकांचा नाहक त्रास चंदगड तालूक्यातील  शांतताप्रिय नागरिकांना  सहन करावा लागत आहे. त्यामुळे चंदगड  पोलिसांनी या अतिउत्साही पर्यटकांवर कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली.  त्यानूसार रविवारी चंदगड पोलिसांनी शिनोळी फाटा, पाटणे फाटा व कानूर, येथे  तपासणी नाका लावून पर्यटकांची झाडाझडती घेतली. यामध्ये मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या पर्यटकांवर कारवाई केली. पो. नि. संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी हि कारवाई केली.

    पावसाळ्यात    चंदगड तालुक्यात पारगड, स्वप्नवेल, तिलारी सवतकूळ(सूंडी) तसेच आंबोली, आंबोली धबधबा, कावळेसाद, नांगरतास धबधबा अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते.

       दरम्यान काल हिडगाव फाटा व कानुर येथे १२ते ५ वाजेपर्यंत पर्यन्त नाकाबंदी करून ३५ मोटारसायकल व ३० चार चाकी वाहनाची कागदपत्रे तपासून ३५ वाहनावर दंडात्मक कारवाई करून १३हजार ३००रूपये दंड वसूल केला आहे.

 पर्यटकांना चंदगड पोलीसांचे आवाहन 

     सर्व पर्यटकांना चंदगड पोलीस स्टेशन तर्फे आवाहन आहे की वर्षा सहली दरम्यान निसर्गाचा आनंद घ्यावा. कोणीही खोल पाण्यात, अंदाज न येणाऱ्या धबधब्यामध्ये उतरू नये तसेच मद्य प्राशन करून हुल्लडबाजी करत वाहन चालवू नये. हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कडक कारवाई सतत चालू राहणार आहे. चंदगड तालुक्यामध्ये शिनोळी, पाटणे फाटा आणि कानूर खुर्द अशा तीन ठिकाणी पोलिसांमार्फत नाकाबंदी करण्यात येत आहे.



No comments:

Post a Comment