वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या चंदगडच्या युवकाचा रामघाटात झाला बुडून मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2023

वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या चंदगडच्या युवकाचा रामघाटात झाला बुडून मृत्यू

ऋषिकेश संजय प्रभळकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    पारगड परिसरात वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या चंदगड येथील युवकाचा रामघाटातील महादेव मंदिरा समोरील कुंडात बुडून मृत्यू झाला. ॠषीकेश संजय प्रभळकर (वय वर्ष २४, रा.नवीन वसाहत चंदगड) असे मयत युवकाचे नाव आहे.

     या संदर्भात पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, चंदगड मधील मित्रांसोबत ॠषीकेश हा पारगड परिसरात वर्षां पर्यटनासाठी केला होता. दरम्यान वाटेत असलेल्या रामघाटातील पुरातन महादेव मंदिर परिसराकडे गेले होते. मंदीरापुढील कुंडात अंघोळीला मित्रासोबत ऋषीकेश ही उतरला. पण पाण्याचा अंदाज न आल्याने गंटागळ्या खात असल्याने मित्रांनी पाण्याबाहेर काढले. अधिक उपचारासाठी चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारापूर्वीच ॠषीकेश याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबतची वर्दी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गायकवाड यांनी चंदगड पोलीसात दिली. अधिक तपास पो हे काॅ संभाजी कोगेकर करत आहेत.

पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांचे पर्यटकांना आवाहन

        सर्व पर्यटकांना चंदगड पोलीस स्टेशनतर्फे आवाहन आहे की, वर्षा सहली दरम्यान निसर्गाचा आनंद घ्यावा. कोणीही खोल पाण्यात, अंदाज न येणाऱ्या धबधब्यामध्ये उतरू नये. तसेच मध्यप्राशन करून हुल्लडबाजी करत वाहन चालवू नये. हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान आज चंदगड तालुक्यामधील शिनोळी, पाटणे फाटा आणि कानूर खुर्द अशा तीन ठिकाणी पोलिसांमार्फत नाकाबंदी करण्यात येत आहे.No comments:

Post a Comment