आम. राजेश पाटील यांच्या" त्या निर्णयाला" चंदगड तालुका राष्ट्रवादी चा पाठींबा, शिनोळी येथील मेळाव्यात घोषणा - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2023

आम. राजेश पाटील यांच्या" त्या निर्णयाला" चंदगड तालुका राष्ट्रवादी चा पाठींबा, शिनोळी येथील मेळाव्यात घोषणा


                           राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना आमदार राजेश पाटील


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगसाठी कोट्यावधी रूपयांचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यानी उपलब्ध करून दिला होता. पण सत्ता बदलल्याने मंजूर निधी गोठवण्यात आला. पुन्हा सत्तेत सहभागी झाल्याने चंदगड मतदारसंघाचा विकास वेगाने होणार असून चंदगडचा कायापालट करण्यासाठी ज्यानी साथ दिली त्यांच्या  सोबत मी जाणार असल्याचे विचार आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी व्यक्त केले.

        चंदगड तालूका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा मेळावा शिनोळी (ता. चंदगड)  येथे आज संपन्न झाला. चंदगड तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भिकू गावडे यानी बोलावलेल्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या या मेळाव्यात आमदार राजेश पाटील यांनी विकासकामासाठी घेतलेल्या भूमिकेला एकमुखाने पाठींबा देण्यात आला. त्यामुळे चंदगड ची राष्ट्रवादी अभेद्य असून आमदार राजेश पाटील, मंत्री हसन मुश्रीफ व उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या सोबत असल्याचे आज स्पष्ट झाले. या मेळाव्याला मतदार संघातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

      प्रास्ताविक राष्ट्रवादीचे तालूका अध्यक्ष भिकू गावडे यांनी करून मतदार संघात कोट्यावधींचा विकास कामांचा डोंगर उभारणाऱ्या आमदार राजेश पाटील याना साथ देण्याचे आवाहन केले.

     यावेळी बोलताना आमदार राजेश पाटील म्हणाले, ``मी माझ्या आयुष्यात कोणाचे भले करता नाही तरी चालेल पण कोणाचे वाईट तरी करणार नाही. केवळ मतदार संघाच्या विकास साठी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राज्यासह जिल्हातील सर्व नेते अजितदादा सोबत असताना मला प्रवाहाच्या विरोधात जाणे शक्य नव्हते. चंदगडच्या जनतेने  माझ्यावर विश्वास ठेवला. माझ्या आयुष्यातील  पहिला निर्णय मी तुम्हाला विश्वासात न घेता घेतला. तो निर्णय योग्य की अयोग्य पुढील काळ ठरवेल. आमदारकीला उभे राहण्यापूर्वी बोलवलेल्या सभेला प्रचंड पाऊस असतानाही येथे येऊन असाच मला पाठींबा दिल्याने मी आमदार झालो. तीन वर्षात आपण सूचवलेली सर्व कामे प्रामाणिक पणे पूर्ण केली. यासाठी वारंवार मला हसन मुश्रीफ यानी ताकद पुरवली.  केडीसीसी रिक्त जागेवर मला मुश्रीफानी संधी दिली. २०१९ ला मुश्रीफ साहेबामुळेच मला विधानसभा तिकीट मिळाले. यासाठी मुश्रीफांचे मोठे योगदान आहे. ग्रामविकास मंत्री असताना खूप मदत झाली. केडीसीसी, गोकूळ कडूनही मदतीचा हात दिला. त्यामुळे मुश्रीफांच्या त विरोधात राहून काय साध्य करणार? यासाठी मी हसन मुश्रीफ यांच्यासोबत आहे. अजित पवार व मुश्रीफ यांच्यामुळे 4 एकर जागा ट्रामा केअरला  केवळ 16 हजारला  मिळाली. अजित दादांनी ट्रामा केअर सेंटरचे भूमिपूजनही केले. पण सत्ता गेल्यान ३४ कोटी निधी गोठवला. तर ८० कोटींची कामे थांबवली. जिल्हा नियोजन मधून १ कवडी रुपयांचासुद्धा निधी मिळाला नाही. अनेक कामांच्या याद्या मला मिळाल्या. पण निधी नसेल तर कामे कशी करणार ? विरोधात राहून काय साध्य करणार? अजित दादानी अनेक वेळा मला साथ दिली त्यांची साथ आता सोडण अशक्य. 

      पुरोगामी विचारानेच महाराष्ट्र घडवणार आहे. आताही मला साथ  द्या  मी तुम्हाला  विकास कामे देतो असे  सांगून जर माझा निर्णय योग्य असेल तर हात वर करून प्रतिसाद देण्याचे आवाहन आमदार राजेश पाटील यांनी करताच समोरच्या शेकडो कार्यकर्त्यानी `राजेश साहेब तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है` चा नारा दिला.

     यावेळी जानबा चौगुले, भरमाना गावडा, संजय गावडे, शिवानंद हूंबूरवाडी आदिनी आपली मनोगते व्यक्त केली. या मेळाव्याला गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीते अध्यक्ष अभय देसाई, नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ अध्यक्ष महादेव पाटील, तानाजी गडकर, पोमाणा पाटील, बंडोपंत चिगरे' भिमराव चिमणे, एस. एल. पाटील,  महिला राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी  सौ. संगिता पाटील, युवक कॉग्रेसचे सर्व पदाधिकारी यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment