कागणीचे निवृत्त मुख्याध्यापक प्रल्हाद देसाई यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2023

कागणीचे निवृत्त मुख्याध्यापक प्रल्हाद देसाई यांना मातृशोक

 

अंबाबाई शंकर देसाई

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

       कागणी (ता. चंदगड) येथील प्रतिष्ठित नागरिक अंबाबाई शंकर देसाई (वय ९०) यांचे अल्पशा आजाराने रविवार दि. १६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

       दिवंगत निवृत्त शिक्षक शंकर संताजी देसाई यांच्या त्या पत्नी  तर कागणी विद्यामंदिरचे निवृत्त मुख्याध्यापक प्रल्हाद देसाई, रवींद्र देसाई यांच्या त्या आई होत. पुणे येथील व्यवसायिक संदीप देसाई, हेमरस शुगरचे फिल्ड ऑफिसर संजय देसाई यांच्या त्या आजी होत. उत्साळी (ता. चंदगड) येथील  दौलत साखर कारखान्याचे दिवंगत संचालक सखाराम देसाई व सोनारवाडी (ता. चंदगड) येथील निवृत्त शिक्षक भाऊसो जाधव यांच्या त्या सासुबाई होत. रक्षाविसर्जन सोमवार दि. १७ रोजी होणार आहे.

No comments:

Post a Comment