कागणी फिडरवरील अन्याग्रस्त मोटर धारकांना महावितरण कडून दिलासा - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2023

कागणी फिडरवरील अन्याग्रस्त मोटर धारकांना महावितरण कडून दिलासा


कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

       गेल्या दोन-तीन वर्षापासून कागणी फिडर वरील ७५० मोटर धारक शेतकऱ्यांना विना रिडींग लमसम अन्याय कारक बिले येत होती. त्यामुळे लहान मोटर धारक जादा बिलामुळे भरडले जात होते. यासाठी अन्यायधारक मोटर धारका मार्फत संबधीत सर्व अधिकाऱ्यांना अनेक वेळा अर्ज विनंत्या केल्या, मोर्चे काढले एवढेच नव्हे तर तालुक्याचे आमदार राजेश पाटील यांनाही निवेदन दिले. पण याबाबदचा निर्णय अद्याप झालेला नाही.

       शुक्रवार दि १४ रोजी महावितरणचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. अडके व उप कार्यकारी अभियंता नागेश बसरकट्टी यांची संजय कुट्रे व अनिल कुंभार यांनी भेट घेतली. कागणी फिडर बाबत कैफियत मांडली. तसेच किणी गावाला बरेच दिवसापासून वायरमन नसल्याने गावामध्ये गैरसोय होत आहे, अशा समस्यांचे निवेदन दिले. या प्रसंगी सदरच्या समस्या ऐकून कर्त्यव्यदक्ष कार्यकारी अभियंता व्ही. बी. अडके यांनी कागणी फिडरवरील नदीकाठच्या प्रत्येक डीपी वरती स्पेशल मीटर बॉक्स बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले. स्पेशल मीटर बॉक्स बसविल्यामुळे मोटर धारकांना योग्य ती बिलाची आकारणी केली जाईल असे आश्वासन दिले. तसेच किणी गावासाठी वायरमनची तात्काळ नेमणूक केली.

No comments:

Post a Comment