कुदनूरच्या तनुजाने वृक्षारोपनाने केला वाढदिवस साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2023

कुदनूरच्या तनुजाने वृक्षारोपनाने केला वाढदिवस साजरा

वाढदिवसा निमित्य वृक्षारोपन करताना तनुजा हेब्बाळकर व मित्र
                       

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        कुदनूर (ता चंदगड) येथील तनुजा हेब्बाळकर या युवतीने आपल्या वा
ढदिवस केक कापून साजरा न करता हजारो रुपयांची रोपे आणून व त्या रोपांचे वृक्षारोपन करून साजरा केला.

       सध्या वाढदिवस म्हटला की डिजे,  डिजिटल बोर्ड, रंगीत - संगित पार्टी, केक या सर्वांचा समावेश असतो. यासाठी अगदी हजारो रुपयांचा चुराडा केला जातो . पण या सर्वाना फाटा देत तनुजा ने आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. स्वतः उच्च शिक्षित असलेली तनुजा सोशल मेडियावर खूपच अॅक्टीव्ह आहे. याच तनुजाने आपला वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. यानुसार आपल्या पप्पा मम्मीला हा विचार बोलून दाखवला. त्या दोघांनी ही  पर्यावरण रक्षणाच्या तनूजाच्या या उपक्रमाला   प्रोत्साहन दिले. लगेच हजारो रुपये खर्चून  वड, लिंब आंबा अशा विविध प्रकारच्या रोपांची खरेदी करण्यात आली. यानंतर आपल्या आईवडील व मित्रा समवेत या रोपांची लागवड श्री सिधदेश्वर मंदिर कुदनूर व राजगोळी येथे स्वतः खड्डे खणून करण्यात आली. यासाठी तनुजाला विघ्नेश हेब्बाळकर, शुभश्री हेब्बाळकर, सलोनी हेब्बाळकर, मनाली तवनोजी, पीयूष तवनोजी, अवदुंबर तवनोजी, सत्यजित तवनोजी, श्रावणी मल्हारी, आयुष्य जाधव, समर्थ जाधव, देवयानी आंबेवाडकर यांनी मदत केली.

No comments:

Post a Comment