आरसीयू हिंदी अभ्यासक्रम मंडळावर प्रा.विजयकुमार पाटील यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

18 July 2023

आरसीयू हिंदी अभ्यासक्रम मंडळावर प्रा.विजयकुमार पाटील यांची निवड

प्रा. विजयकुमार पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    एसकेई सोसायटीच्या आरपीडी कॉलेजच्या हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. विजयकुमार पाटील (मुळ गाव जंगमहट्टी ता. चंदगड) यांची राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या हिंदी अभ्यासक्रम मंडळावर निवड झाली आहे. जुलै २०२३ ते जून २०२५ या दोन वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे. प्रा. विजयकुमार पाटील हे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळावरही वरिष्ठ पदाधिकारीपदावर कार्यरत आहेत. हिंदी प्राध्यापकांच्या समस्या सोडविणे व हिंदी विषयाच्या तासिका कन्नड तीन या विषयाप्रमाणे वाढवून द्याव्यात यासाठी ते प्रयत्नशील आहेत. एप्रिल २३ मध्ये विद्यापीठाच्या हिंदी प्राध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर व व्यवस्थापन मंडळाने त्यांचे अभिनंदन केले आहे.


No comments:

Post a Comment