चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
दि महाराष्ट्र एज्युकेशन अँड स्पोर्ट्स अकॅडमी चंदगड संचलित महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तूर्केवाडीचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव नागोजी वांद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. २५ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजक वैभव पाटील यांनी दिली.
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन संस्थेचे अध्यक्ष महादेवराव नागोजी वांद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन पॉलिटेक्निक विभागाचे प्राचार्य संतोष गावडे, बी. एडचे प्राचार्य एन. जे. कांबळे, फार्मसी चे प्राचार्य डॉ. एम. सी. महंतेश यांनी याप्रसंगी करण्यात आले.
No comments:
Post a Comment