जिल्ह्यातील ७९ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून १४०० क्युसेक विसर्ग - चंदगड लाईव्ह न्युज

23 July 2023

जिल्ह्यातील ७९ बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणातून १४०० क्युसेक विसर्ग

मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेला पिळणी बंधारा.

कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : 

         जिल्ह्यातील राधानगरी धरणात 6.78 टिएमसी पाणीसाठा असून राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ.

भोगावती नदीवरील- शिरगाव, तारळे, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.

कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, वालोली, बाजारभोगाव, पेंडाखळे, करंजफेण व कुंभेवाडी.

हिरण्यकेशी नदीवरील- साळगांव, सुळेरान, चांदेवाडी, दाभीळ, ऐनापूर व निलजी.

घटप्रभा नदीवरील- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानर्डे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी.

वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली, गारगोटी, म्हसवे व शेणगांव सुक्याचीवाडी.

कुंभी नदीवरील- कळे, शेनवडे, वेतवडे, मांडूकली, सांगशी व असळज

वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, तांदूळवाडी, कोडोली, शिगांव व खोची.

कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगांव, सवते सावर्डे व सरुड पाटणे.

धामणी नदीवरील-  सुळे, पनोरे, आंबर्डे, गवशी व म्हासुर्ली

तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी

ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, काकरे, न्हावेली व कोवाड

दुधगंगा नदीवरील -दत्तवाड,  सुळकुड व सिध्दनेर्ली असे 79 बंधारे पाण्याखाली आहेत.

      जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 1.45 टिएमसी, वारणा 23.83 टिएमसी, दुधगंगा 10.69 टिएमसी, कासारी 2.11 टिएमसी, कडवी 1.90 टिएमसी, कुंभी 2.08 टिएमसी, पाटगाव 2.31 टिएमसी, चिकोत्रा 0.67 टिएमसी, चित्री 0.94 टिएमसी, जंगमहट्टी 0.66 टिएमसी, घटप्रभा 1.56 टिएमसी, जांबरे 0.82 टिएमसी , आंबेओहोळ 0.65 टिएमसी, कोदे (ल.पा) 0.21 टिएमसी असा आहे.

        तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 37.1 फूट, सुर्वे 35.5 फूट, रुई 65.2 फूट, इचलकरंजी 60.6.

No comments:

Post a Comment