![]() |
ग्रीन व्हॅली रीसॅर्ट येथील धो-धो कोसळणारा पांढराशुभ्र धबधबा. |
चंदगड तालुक्यामध्ये सुंडी धबधबा, किटवाड धबधबा, बाबा धबधबा, स्वप्नवेल पॉईंट तिलारी घाट, पारगड किल्ला, गंधर्वगड किल्ला, कलानंदिगड किल्ला, महिपाळगड किल्ला फाटकवाडी धरण, जांबरे धरण, जंगमहट्टी धरण हि पर्यटन स्थळे आहेत. पासाळयात या ठिकाणी पर्यटक मोठया प्रमाणात भेट देत असतात. चंदगड तालुक्यामध्ये येणाऱ्या पर्यटक व नागरिक यांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, यासाठी खबरदारी उपाय म्हणून दि. २२ जुलै ते ३ ऑगस्ट २०२३ या कालावधीत पर्यटन स्थळांकडे जाण्यासाठी पर्यटक व स्थानिक लोकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे आवाहन चंदगडचे तहसिलदार राजेश चव्हाण यांनी केले आहे.
बरीच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी नेटवर्क नसलेने बरेच पर्यटक यांचेशी संपर्क होत नाही. तिलारी धरणाच्या सांडव्यामध्ये माहे जून मध्ये २ पर्यटक पोहोयला गेल्यानंतर बुडून मयत झालेल्या घटना घडलेल्या आहेत. चंदगड तालुक्यात मोठया प्रमाणात पाऊस पडत असलेने नदी, नाले ओढे पात्राबाहेर पडलेले आहेत. पिळणी, भोगोली, हिंडगाव, सावर्डे अडकूर, कोनेवाडी - करंजगाव हेरे चंदगड बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. संभाव्य पाऊसाची स्थिती पाहता पर्यटकांच्या जावीताला धोका होवू शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदीरीचा उपाय म्हणून चंदगड तालुक्यातील पर्यटन स्थळांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांनी सुचनांचे पालक करावे से आवाहन तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या वतीने केले आहे.
No comments:
Post a Comment