चंदगड तालुक्यात पावसाचा जोर, कोवाड बाजारपेठेत शिरले पाणी, व्यापारी चिंतेत - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2023

चंदगड तालुक्यात पावसाचा जोर, कोवाड बाजारपेठेत शिरले पाणी, व्यापारी चिंतेत

 

जोरदार पावसामुळे कोवाड (ता. चंदगड) येथील बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरवात झाली आहे. तर कोवाड जुना बंधाराही पाण्याखाली गेला आहे.

चंदगड / प्रतिनिधी

चंदगड तालुक्यात  सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.तालुक्यात पाच घरांची पडझड होऊन लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.कोवाड बाजारपेठेतील दुकानातून पाणी शिरण्यास सुरवात झाल्याने दुकानदारांनी धावपळ सुरू झाली आहे.शनिवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता.ताम्रपर्णी नदीवरील  कोकरे,न्हावेली, चंदगड कोनेवाडी, हल्लारवाडी व करंजगाव तर घटप्रभा नदीवरील पिळणी,भोगोली,हिंडगाव,कानडी,सावर्डे,अडकुर,कानडेवाडी,तारेवाडी हे ७ बंधारे आजही सलग तिसऱ्या दिवशी पाण्याखालीच आहेत. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात तालुक्यात सरासरी ६४.८ तर आतापर्यंत ५७०  मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडलनिहाय पाऊस चंदगड - ९१.५मिमी (९५४.४), नागणवाडी ६३मिमी (४५५.८), माणगाव -५५मिमी (४६१.८), कोवाड -३५.३मिमी (२९१.३), तुर्केवाडी -५२.५मिमी (५५८७), हेरे -९१.५मिमी (६९६) असा झाला आहे.संततधार पडणाऱ्या पावसामुळे  कोवाड परिसरातील शेतीचें मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे. कोवाडचा जुना बंधारा पाण्याखाली गेला आहे कोवाड निट्टूर घुल्लेवाडी म्हाळेवाडी शिवणगे किणी या गावातील शेतीचें नुकसान झाले पाऊसांमुळे रोप लावणीला उशिरा होत आहे तर काही ठिकाणी शेतीत पाणी भरले आहे शेतीला तळाचे स्वरूप निर्माण झाले आहे.चंदगड तालुक्यातील घटप्रभा व झांबरे हे मध्यम प्रकल्प यापूर्वीच ओव्हर फ्लो झाले आहेत, तर जंगमहट्टी प्रकल्पात ४८ टक्के पाणी साठा झाला आहे.

No comments:

Post a Comment