डुक्करवाडीचे नामकरण आता "रामपूर", शासनाच्या राजपत्रानुसार झाला बदल - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2023

डुक्करवाडीचे नामकरण आता "रामपूर", शासनाच्या राजपत्रानुसार झाला बदल

 

चंदगड / प्रतिनिधी
डुक्करवाडी (ता. चंदगड) गावाचे नाव आता रामपूर झाले असून तसा प्रस्ताव गेल्या ७ जुलै २०२३ रोजी मंजूर होऊन त्याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या २० जुलै २०२३ च्या राजपत्रात झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. डुक्करवाडी ग्रामस्थांनी गेल्या दोन दशकापासून 'रामपूर' हे नवे नाव धारण करण्याचा प्रयत्न चालवला होता. परंतु शासकीय पातळीवर त्याला प्रतिसाद मिळत नव्हता.
      तथापि त्याला उशिरा का होईना यश आले आहे. मौजे डुक्करवाडी या गावाचे नाव बदलून ते रामपूर असे करण्याच्या प्रस्तावास भारत सरकारच्या गृहमंत्रालय यांचे पत्र क्रमांक ११/१४/२०२३ दि. ७ जुलै २०२३ अन्वये दिलेल्या अनुमतीनुसार महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे असा आदेश देत आहे की, मौजे डुक्करवाडी (ता. चंदगड) या गावचे नाव बदलून ते मौजे रामपूर असे करण्यात यावे , असे पत्र उपसचिव रो. दि. कदम - पाटील यांनी शासनाच्या ४१ विभागात पाठवले आहे. या निर्णयाबद्दल तालुक्यात आनंद व्यक्त होत आहे. दरम्यान गावचे नाव रामपूर करण्यासाठी गावचे सुपूत्र म॔त्रालयीन अवर सचिव सुरेश नाईक, किरण देशपांडे, विभागिय सहनिबंधक अरूण काकडे, आजी-माजी सरपंच, सदस्य, तरूण मंडळ, ग्रामस्थ आदीचे सहकार्य लाभले. काल पासूनच ग्रामस्थांना ७/१२, व ८अ उतारे, घरठाण उतारे तसेच ऑनलाईन उतारे रामपूर या नावानेच मिळण्यास सुरवात झाली आहे.


No comments:

Post a Comment