तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
किणे (ता. आजरा) येथील सौ. सुनीता अर्जुन गुडूळकर (वय ४५ वर्ष) या महिलेच्या अंगावर राहत्या घराची भिंत गुरुवार दि. २६ रोजी सकाळी ७ च्या दरम्यान पडली होती. यावेळी त्यांना तात्काळ उपचारासाठी नेसरी येथे नेण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होती.
दरम्यान अधिवेशनातून आल्या नंतर तात्काळ घटनास्थळी आमदार राजेश पाटील यांनी आज देवून कुटुंबियांतील लोकांचे सांत्वन केले.
तसेच यावेळी आमदार राजेश पाटील यांनी प्रशासनाला सदर कुटुंबाला शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी तात्काळ प्रस्ताव पाठवावेत अशी सूचना जिल्हाधिकारी तहसीलदार व प्रशासनाला दिल्याचे सांगितले. तसेच या कुटूंबाला लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी मुकुंददादा देसाई, सुभाष देसाई, मधुकर यलगार, मष्णू सुतार, जयसिंग चव्हाण, जयवंत सुतार, दिगंबर देसाई, अनिल फडके, जनार्दन बामणे आदि मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment