मराठा सेवा संघ व संलग्न कक्षांची गडहिंग्लज येथे रविवारी बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2023

मराठा सेवा संघ व संलग्न कक्षांची गडहिंग्लज येथे रविवारी बैठक

  
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         मराठा सेवा संघ व संलग्न सर्व कक्षांची संयुक्त मासिक सभा रविवार दि ०६ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता हाॅटेल सूर्या हाॅल, आजरा रोड, गडहिंग्लज, येथे आयोजित करण्यात आली आहे.

  बैठकीत केंद्रीय कार्यकारिणीच्या निर्णयांची व प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी निवडीची माहिती घेणे,  मराठा सेवा संघाचा ३३ वा वर्धापन दिन साजरा करणेबाबत नियोजन करणे, मराठा आरक्षण सद्यःस्थिती, मराठा तरुण तरुणींसाठी  नोकरी, उद्योग, व्यवसायातील संधी तसेच  शासकीय स्तरावरून होणाऱ्या विविध लाभाच्या योजनांची माहिती देणे, गडहिंग्लज व अन्य तालुक्यातील मराठा सेवा संघ व अन्य कक्षांचे तालुका व स्थानिक स्तरावरील नवीन पदाधिकारी निवड आदी विषयांवर विचारविनीमय होणार आहे. तरी मराठा सेवा संघ व अन्य कक्षांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुका, शहर, गाव स्तरावरील सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, आजीव व सर्वसाधारण सदस्य, मराठा सेवा संघ या संघटनेशी व विचारांशी सहमत असलेल्या व संघटनेचे नव्याने काम करणेकरीता इच्छुक असलेल्या सर्वांनी  उपस्थित राहावे. असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महिपती बाबर (कुरुंदवाड, ता. शिरोळ) व जिल्हा प्रवक्ते शहाजी देसाई (कडगाव, भुदरगड) आदींनी केले आहे.          

   बैठकीत मराठा सेवा संघाच्या नव्याने निवडणेत आलेल्या राज्य कार्यकारिणीवर कोल्हापूर जिल्ह्यांतील तिघांना संधी मिळाली आहे. त्यांचा विशेष सत्कार मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक व खास प्रतिनिधी यांचे शुभहस्ते होणार आहे.

No comments:

Post a Comment