चंदगड पोलिसांकडून नियम मोडणाऱ्या ३६ वाहनांवर कारवाई, अकरा हजारांचा दंड वसुल - चंदगड लाईव्ह न्युज

30 July 2023

चंदगड पोलिसांकडून नियम मोडणाऱ्या ३६ वाहनांवर कारवाई, अकरा हजारांचा दंड वसुल

कारवाई करताना पोलीस


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        विविध शहरातून चंदगड तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची तपासणी करुन ३६ वाहनांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करून १० हजार ७०० रुपयांचा दंड वसुल केलेला आहे. तसेच नाकाबंदी दरम्यान एक ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई  केली आहे. चंदगड पोलिसांनी तडशिनहाळ फाटा व हलकर्णी एमआयडीसी येथे नाकाबंदी करुन रविवारी (ता. ३०) रोजी हि कारवाई केली. नाकाबंदी दरम्यान 60 वाहनांची तपासणी करुन दोषी ३६ वाहनधारकांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली. चंदगडचे पोलीस निरिक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना श्री.  भदरगे, पो. का. श्री. कोळेकर व ४ होमगार्ड यांनी हि कारवाई केली. 

                         पर्यटकांना पोलिसांचा संदेश

      चंदगड येथे येणाऱ्या पर्यटकांचे स्वागताच आहे. परंतु शांतता भंग करणारे व हुल्लडबाजी करणाऱ्या विरोधात शनिवारी व रविवारी अशी मोहीम राबविण्यात येत आहे. पर्यटकांनी व वाहनधारकांनी शांततेत निसर्गाचा आनंद घ्यावा. सहकुटुंब व शांततेत आनंद घेणाऱ्या पर्यटकांना हुल्लडबाजी करून त्रास देऊ नये. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती पो. नि. श्री. घाेळवे यांनी दिली.

No comments:

Post a Comment