पहिल्याच पावसात फाटकवाडी धरण ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांतून समाधान - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2023

पहिल्याच पावसात फाटकवाडी धरण ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांतून समाधान

ओसंडून वहात असलेला घटप्रभा प्रकल्प.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा (नंदकुमार ढेरे)

     गेले तीन दिवस सुरू असलेल्या संतत धार पावसामुळे चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी व घटप्रभा या दोन नद्या तसेच ठिक- ठिकाणचे ओढे, नाले, तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. बुधवार, गुरूवार व शुक्रवारी चंदगड तालुक्यात पावसाची  सततधार  सूरू झाली. मोठ-मोठ्या सरिवर सरी पडू लागल्यामुळे बघता बघता सर्वत्र पाणीच पाणी होवुन लागले.  दुपार पर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील जांबरे, जंगमहट्टी, फाटकवाडी प्रकल्पांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

       घटप्रभा नदीवर असलेला फाटकवाडी मध्यम प्रकल्प यावर्षी ५ जूलै रोजी भरला यापूर्वी महिनाभर पावसाने ओढ दिली होती. मात्र तरीसुध्दा गेल्या वर्षीच्या तुलनेत २ दिवस उशिरा भरला असला तरी देखील महाराष्ट्रात पहिल्यांदाच भरणम्याचा मान यावर्षीही या फाटकवाडी धरणाने मिळवला.

       चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यात वरदान असलेला हा प्रकल्प नेहमीच पहिल्याच पावसात भरतो मे अखेर यामध्ये ४५ टक्के पाणीसाठा होता. प्रकल्प मंगळवारी ५जूलै रोजी भरला होता. यावर्षी महिनाभर पावसाने ओढ दिली होती त्यामुळे प्रकल्प भरण्यास आजुन ८ ते १० दिवस लागणार असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. घटप्रभा पात्र काल पर्यंत ९३% होते. अजुनही शिवारात म्हणावी तशी उंबळट झाली नाही मात्र बुधवार, गुरूवार व शुक्रवार या तीन दिवसात झालेल्या दमदार पावसाने मोठ्या प्रमाणात धरणाच्या सांडव्यातून पाणी प्रवाहित झाले त्यामुळे पुढील वर्षाच्या शेतीच्या पाण्याची तजवीत झाली शेतकरी सुखावला आहे. 

        या प्रकल्पातुन चंदगड तालुक्यातील २८ गडहिंग्लज तालुक्यातील १४ गावातील शेकडो हेक्टर शेतजमिनीसाठी आणि बऱ्याच गावच्या पिण्याचा पाण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. त्याच प्रमाणे फाटकवाडी प्रकल्पाच्या पाण्यावर दररोज ८ मेगावँट वीजनिर्मितीही होत. प्रकल्प पूर्ण भरल्यानंतर सांडव्यातून मोठ्या उंचीवरुन पाणी पडते. निसर्गरम्य परिसर असल्यामुळे या धरणक्षेत्राला मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावतात. सध्या साप्ताहीक बाजारापैकी अडकूर, कोवाड, चंदगड या बाजारात खेकडी विक्री वाढल्याचे पाहावयास मिळाले.

घटप्रभा मध्यम प्रकल्पांतील पाण्याची आज ७/७/२०२३ ची स्थिती
● दुपारी -४.०० वा पाणी पातळी –७४२.६० मी
● एकूण पाणीसाठा – ४४.१७२  द.ल.घ.मी(१५५९.९३४ द.ल.घ.फू.)  
टक्केवारी - १००%
● मागील ९ तासातील पाऊस ५० मिमी एकूण पाऊस -१०३२
●विद्युतगृह विसर्ग- ९०० क्युसेक्स 
● सांडवा विसर्ग-६९७.३६  क्युसेक

No comments:

Post a Comment