कालकुंद्री येथील सरस्वती विद्या संकुलात भरलेल्या कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2023

कालकुंद्री येथील सरस्वती विद्या संकुलात भरलेल्या कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

         कालकुंद्री (ता. चंदगड) येथील सरस्वती विद्या संकुलामध्ये श्रावण मासाचे औचित्य साधून ज्युनिअर विभागाच्या वतीने प्राचार्य एस. एल. बेळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनाला निमंत्रित कवी म्हणून एन. जे. बाचुळकर, वाय. के. पाटील, व इराप्पा पाटील उपस्थित होते.

      प्रारंभी प्रा. विनायक कांबळे यांनी संमेलनाचा उद्देश व मराठी कवितेचा इतिहास आपल्या प्रास्ताविकातून सांगितला. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर केल्या यामध्ये विनायक पाटील, एकनाथ मनवाडकर, सुमित कांबळे, प्रीती वडर, आदिती कुट्रे व सानिका पाटील यांनी आपल्या कविता सादर केल्या. कवी संमेलनामध्ये प्रा. रवी पाटील, प्रा. संग्राम पाटील, प्रा.अनिल गुरव या शिक्षकांनी सहभाग घेतला. इराप्पा पाटील यांनी आपल्या प्रेम कविता व वास्तव कवितांनी प्रेक्षकांची मन जिंकली. तर वाय. के. पाटील यानी 'मी गाढव' या कवितेच्या माध्यमातून प्राणी आणि माणूस यांच्यातला फरक सुंदररित्या पटवून दिला. संमेलनाच्या शेवटी अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य बेळगांवकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून कविसंमेलनाचा समारोप केला. यावेळी प्रा. डी. एम. तेऊरवाडकर, प्रा. बामणे व प्रा. कांबळे यासह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विनायक कांबळे यांनी केले तर आभार प्रा. अनिल गुरव यांनी मानले.

No comments:

Post a Comment