![]() |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
ग्रामपंचायत कोवाड (ता. चंदगड) मार्फत गेल्या दहा वर्षात कोवाड गावठाण किंवा गायरान हद्दीतील जागा ज्या-ज्या प्लॉट धारकांना देण्यात आली आहेत. त्यांची नावे जाहीर करण्याची मागणी उध्दव ठाकरे शिवसेना चंदगड तालुका प्रमुख लक्ष्मण शिवाजी मनवाडकर व सहकारी अनिरुद्ध रामचंद्र कुट्रे (रा. कोवाड) यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या दहा वर्षात व अलीकडच्या काळात काही लोकांना ग्रामपंचायतीने गावठाण व गायरान मधील जागा घरे बांधून राहण्यासाठी देण्यात आली होती. तथापि बेघर आहेत म्हणून दिलेले हे प्लॉट संबंधितांनी परस्पर विक्री करून गैरवापर केल्याचा केल्याची चर्चा गावात सुरू आहे. याची शहानिशा करण्यासाठी ग्रामपंचायतीने अशा लोकांच्या नावांची यादी आपणास द्यावी. तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोर्डवर लावावी. अशी मागणी शिवसेना चंदगड तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर व अनिरुद्ध कुट्रे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागणीचे निवेदन नुकतेच ग्रामसेवक दोरुगडे यांना देण्यात आले. यावेळी लक्ष्मण मनवाडकर, अनिरुद्ध कुट्रे, परशराम कडलगेकर, राम मनवाडकर आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment