विराज झळकला जगभरात, तायकांदो मध्ये सुवर्ण पदकाला गवसणी - चंदगड लाईव्ह न्युज

25 August 2023

विराज झळकला जगभरात, तायकांदो मध्ये सुवर्ण पदकाला गवसणी

विराज बिरंजे पदक स्विकारताना

तेऊरवाडी / एस. के. पाटील

       परिस्थितीवर मात करून मनात जिंकण्याची प्रचंड जिद्द असेल तर जगही मुठ्ठीत ठेवता येते. याची प्रचिती गडहिंग्लज तालुक्यातील छोट्याशा असणाऱ्या नौकूड गावातील विराज बिरंजे यानी दिली. द. कोरिया येथे झालेल्या वर्ल्ड तायकांदो स्पर्धेत कोरियोगी फाईटमध्ये सुवर्ण तर फुमसे प्रकारामध्ये रौप पदक पटकावून सोनेरी यशाला गवसणी तर घातलीच पण संपूर्ण जगाकडूनही वाहवा मिळवली.

   दक्षिण कोरिया या ठिकाणी झालेल्या या स्पर्धेत जगभरातून एकुण १६ देश व २००० खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये विराजला एकुण ५ फाईट खेळाव्या लागल्या. यामध्ये o.२८ गुण मिळवत  एक सुवर्ण व एक रौप्य पदकावर नाव कोरले. एका ग्रामिण भागातील विराजने एवढे मोठे यश संपादन करून तालूक्या बरोबच देशाचे नावही जगभरात नेले. या  सुवर्ण यशाबद्दल चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील यांनी विपूलचे अभिनंदन केले. तर नौकूड चे सरपंच शुक्राचार्य चोथे, उपसरपंच सौ. रेखा सरदेसाई, ग्रामसेवक विजय जाधव सर्व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी विराजचे अभिनंदन केले. विराजला नारायण कांबळे यांचे मार्गदर्शन तर  पुणे येथे कंपनीत कामाला असणारे वडील विपूल व आई सौ. शितल यांचे प्रोत्साहन लाभले.

No comments:

Post a Comment