चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे त्वरीत भरण्याची मागणी चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक आनंद उर्फ बाळासाहेब हळदणकर यांनी निवेदनाद्वारे कोल्हापूरच्या आरोग्य उपसंचालकाकडे केली आहे.
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, ``चंदगड तालुका हा महाराष्ट्रातील शेवटचा तालुका डोगंरी व दुर्गम असून ग्रामिण रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. रुग्णांना सर्पदंश, विंचूदंश, जंगली प्राणी यांच्यापासून हानी झालेस बेळगांव, गडहिंग्लज किंवा कोल्हापूर या ठिकाणी पोहचेपर्यंत रुग्ण वाटेतच दगावतात.
ग्रामीण रुग्णालयात बाहयरुग्ण, अंतररुग्ण, पोष्ट मार्टम, प्रसूती रुग्णांची संख्या जास्त आहे. यांचा अतिरिक्त ताण रुग्णालयावर `येत आहे. तसेच रुग्णालयीन इतर कामकाजावर लक्ष देणे कठीण होत आहे. चंदगड ग्रामीण रुग्णालयात पदे रिक्त असल्या कारणाने रुग्णांची हेळसांड होत आहे. जी पदे रिक्त आहेत ती तातडीने चंदगड ग्रामीण रुग्णालयामध्ये भरण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी निवेदन देताना नगरसेवक आनंद उर्फ बाळासाहेब हळदणकर उपस्थित ऋषिकेश कुट्रे, सिताराम नाईक, औदुंबर कुट्रे आदिजन उपस्थित होते.
No comments:
Post a Comment