हजगोळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शितल पवार यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2023

हजगोळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शितल पवार यांची निवड

शितल पवार
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     हजगोळी (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शितल विनायक पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी मंडलाधिकारी बाळासाहेब सलगर होते. ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. 

      मागास प्रवर्ग गटात महिला वर्गासाठी आरक्षित होते. विद्यमान सरपंच ऋतिका खेमाना कांबळे यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. या पदावर सरपंचपदी सौ. शितल पवार यांची करण्यात आली. निवड करण्यासाठी सरपंच पदासाठी सौ. पवार यांचे नाव सदस्य व्यकंटेश कनगुटकर यांनी सुचवले. यावेळी सदस्य तुकाराम शिंदे, उपसरपंच दीपक पाटील, सदस्या व माजी सरपंच ऋतीका कांबळे, लता पाटील, शारदाबाई सुतार,किरणबाई पाटील उपस्थित होत्या. नूतन सरपंच शितल पवार यांच्या सत्कार मंडलाधिकारी बाळासाहेब सलगर यांच्या हस्ते करण्यात आला. तुडये गाव कामगार तलाठी गणेश रहाटे, ग्रामसेवक कैलास माळी, संजय दळवी, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष एम. बी. पाटील, उपाध्यक्ष विनायक पवार, गोविंद पाटील, शंकर कणगुटकर, प्रकाश कोळसेकर, तुकाराम शिंदे, नामदेव शिंदे, कणगुटकर यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment