चंदगड-हजगोळी बससेवा पूर्ववत सुरू करा, हजगोळी, माडवळे ग्रामस्थांचे आगार प्रमुखांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

26 August 2023

चंदगड-हजगोळी बससेवा पूर्ववत सुरू करा, हजगोळी, माडवळे ग्रामस्थांचे आगार प्रमुखांना निवेदन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

     चंदगड-तुर्केवाडी-माडवळे-हजगोळी या मार्गावर सूरू असणारी बस सेवा पुर्ववत सुरू ठेवा अशी मागणी हजगोळी, माडवळे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे आगार प्रमुख विजय शिंदे यांचेकडे केली आहे.

   हजगोळी, माडवळे, तुर्केवाडी येथील ग्रामस्थ दररोज नोकरी व कामानिमित्त चंदगड गडहिंग्लज, कोल्हापूरला तर विद्यार्थी शिक्षणासाठी कार्वे, हलकर्णी, चंदगड येथे येत असतात. पण सकाळ आणि संध्याकाळीच बससेवा हजगोळी पर्यंत बससेवा असल्याने मधील कालावधीत विद्यार्थी व नागरिकांना तुडीये इथूनच परत चंदगडला जावे लागते. सायंकाळची बस सेवा हजगोळी येथे रात्री थांबा करून जुन्या रूटप्रमाणे सकाळी ७.०० वाजता व पुन्हा सकाळी ९.०० वाजता हाजगोळी माडवळे-तुर्केवाडी ते चंदगड अशी बससेवा हजगोळी येथूनच सुरु करावी व दुपारची सुरु असलेली बस सेवा कायम ठेवण्यात यावी अशी मागणी केली आहे. विनायक पवार, तुकाराम शिंदे, व्यंकटेश कनगुटकर, प्रमोद गिरी, दिपक शिंदे, रोहीत गावडे आदीनी हे निवेदन आगार प्रमुख विजय शिंदे यांना दिले.

No comments:

Post a Comment