तुर्केवाडी महादेवराव बी.एड. कॉलेजमध्ये शुभेच्छा समारंभ' संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

16 September 2023

तुर्केवाडी महादेवराव बी.एड. कॉलेजमध्ये शुभेच्छा समारंभ' संपन्न


चंदगड / प्रतिनिधी
      तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेवराव बीएड महाविद्यालयात २०२१-२०२३  मधील द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थीं विद्थार्थाचा 'शुभेच्छा समारंभ' संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष  महादेवराव वांद्रे होते. संस्थेचे संचालक उमर पाटील व संचालिका सौ. मृणालिनी वांद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आली. 'देशाचे भविष्य घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकाजवळ असते. त्यामुळे देशभक्तीने प्रेरित आणि मनाने खंबीर असलेले विद्यार्थी तुम्ही घडवावेत असे प्रतिपादन प्रा. प्रधान ग. गो. यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
    बी. एड. पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षण घेऊन आपली नवी ओळख निर्माण करावी. संस्थेच्या विकासासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन अध्यक्ष  महादेवराव वांद्रे यांनी केले व प्रशिक्षणार्थींना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 प्रभारी प्राचार्य एन. जे. कांबळे यांनी '२१व्या शतकातील आव्हाने पेलण्यासाठी सर्जनशील, प्रयोगशील व कृतिशील बनण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे असे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आदर्श प्रशिक्षणार्थी म्हणून सविता चौगुले व उत्कृष्ट सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून पूजा सुतार यांचा गौरव करण्यात आला.यावेळी द्वितीय वर्षातील सविता चौगुले, मीरा चौगुले, उज्वला कांबळे, तुकाराम नाईक, कमल हलगेकर, भुजंग पाटील, पुनम तुर्केवाडकर, मनोज जांबोटकर यांनी मनोगते व्यक्त केले. प्रथम वर्षातील प्रशिक्षणार्थी अश्विनी नरी,मयुरी कांडर, विद्या पाटील, मोहन चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. सी. महंतेश, पॉलीटेक्निकचे प्राचार्य एस. पी. गावडे, कार्यालयीन अध्यक्ष श्रीमती एस. आर. देशपांडे, प्रा. वैभव पाटील, प्रा. श्रीमती प्रियंका कदम, प्रा. स्वप्नील सुतार, प्रा. सुप्रिया चौगुले, प्रा. सुरज पाटील, प्रा. सूर्यकांत कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षणार्थी मयुरी कांडर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी रसिका तोडकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार मरुताई पाटील यांनी मानले.No comments:

Post a Comment