चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य अभियंता संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा विभागीय प्रतिनिधीपदी शिवाजी हणमंत नेसरकर यांची निवड करण्यात आली. अभियंता दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर येथील कार्यक्रमात ही निवड करण्यात आली.
यावेळी कार्यकारी अभियंता श्री. आजगेकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी, संतोष पाटील - चंदगड, योगेश पोळ - शिरोळ, अविनाश पदमाळे - गडहिंग्लज यासह सर्व उपविभागीय अभियंता तसेच कोल्हापूर पाटबंधारे व जलसंधारण विभागाचे सर्व अभियंता उपस्थित होते. जलसंपदा जलसंधारण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील वर्ग-१ व वर्ग-२ पदावरील अभियंत्यांची ही एक मोठी संघटना असून या विभागातील सर्व अधिकारी यांची सर्वंकस कामे व वैयक्तिक कामेही या संघटनेच्या माध्यमातून केली जातात. अशा संघटनेमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिवाजी नेसरकर यांचे मुळ गाव निट्टूर (ता. चंदगड) असून ते कोल्हापूर येथील जलसंधारण विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
No comments:
Post a Comment