मधमाशांच्या हल्ल्यात जखमी गाईचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

22 October 2023

मधमाशांच्या हल्ल्यात जखमी गाईचा मृत्यू



चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

     कागणी (ता. चंदगड) येथील विश्वनाथ कलाप्पा देसाई यांच्या गाईचा मधमाशांनी केलेले हल्ल्यात मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी वारी नावाच्या शेतात ही घटना घडली. प्रवीण परशराम देसाई व ओमकार विश्वनाथ देसाई हे दोघे आपल्या जनावरांसह शेतात गेले होते. मात्र घारीने उठवलेल्या मधमाश्यानी  ओमकार व प्रवीण वर हल्ला केला यात हे दोघे जखमी झाले तर गाईवर ही मधमाशांनी हल्ला केला. यात ओमकार व प्रवीणची परिस्थिती सुधारली तर गाईचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. या घटनेमुळे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले. शासनाने त्यांना मदत करावी अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment