चंदगड / प्रतिनिधी
विचारांच्या कृतीतून माणसं घडतात.खेड्यातील विद्यार्थी अनेक क्षमतांनी परिपूर्ण आहे. पालकांच्या नंतरचा विद्यार्थ्यांच्या जवळचा माणूस म्हणजे शिक्षक होय. विद्यार्थी चांगल्या पदावर गेला की गुरु यशस्वी होतो. शिक्षक सामाजिक संस्थांशी जोडला जावा. विद्यार्थी संशोधक वृत्तीने घडताना दिशादर्शक होणे ही शिक्षकाची जबाबदारी असते. " असे प्रतिपादन प्रा. अशोक दास (इचलकरंजी) यांनी केले.हलकर्णी
ता.चंदगड येथील यशंवतराव चव्हाण महाविद्यालयात स्टाफ अकॅडमी आणि नॅक अंतर्गत संपन्न झालेल्या उदबोधन वर्गात ते प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था मार्गदर्शक गोपाळराव पाटील होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे उद्घाटन वृक्ष संवर्धन संदेशाने झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक प्रबोधिनी प्रमुख डॉ.चंद्रकांत पोतदार यांनी करून दिला.गोपाळरावजी पाटील यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रा. सुरेंद्र दास, संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील आणि नॅक समन्वयक डॉ.राजेश घोरपडे आदी उपस्थित होते.विद्यार्थी -शिक्षक -आणि पालक यांची उच्च शिक्षणातील भूमिका या अनुषंगाने प्रा. दास यांनी आपले चिंतन व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.जे.पी. पाटील यांनी केले, तर आभार प्रा.ए.एस बागवान यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ विभागाकडे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
No comments:
Post a Comment