चंदगड / प्रतिनिधी
सर्वगुणसंपन्न शिक्षकच आदर्श विद्यार्थी घडवतात. बदलत्या युगानुसार बदलत राहील पाहिजे.माणूस हा सवयीचा गुलाम आहे. त्यामुळे सवयी बदलाव्यात तरच माणसाची प्रगती होऊ शकते. उद्याचे आदर्श नागरिक घडवण्याचे काम शिक्षक करत करतो,असे प्रतिपादन मुख्याध्यापक आर एस कांबळे यानी केले.ते शिनोळी ता.चंदगड येथील वसंत विद्यालयात महादेवराव वांद्रे बी एड कॉलेज तुर्केवाडीच्या शिवराय गट क्रमांक ३ शालेय अनुभवाचा दुसऱ्या टप्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुलोचना भोगण यानी केले.यावेळी महादेवराव वांद्रे बी एड कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा ग गो प्रधान म्हणाले, शिक्षणातील पदव्याचा पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करावी.आपल्या शिक्षणाचा वापर रोजगार मिळवण्यासाठी नव्हें तर रोजगार निर्मिती साठी करावा.यावेळी पी एन मंडोळकर,एस टी बोकडे, एस बी पाटील,एम.के बेळगावकर, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्या पाटील यांनी केले.तर आभार सोनाली वळतकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment