अडकूर येथे गोवा बनावटीचा साडेपाच लाखांचा मद्य साठा जप्त, एकजण ताब्यात - चंदगड लाईव्ह न्युज

21 October 2023

अडकूर येथे गोवा बनावटीचा साडेपाच लाखांचा मद्य साठा जप्त, एकजण ताब्यात

  

पकडलेली गोवा बनावटीची दारु.

चंदगड / प्रतिनिधी 

      अडकूर (ता. चंदगड) येथे गोवा बनावटीची ५ लाख ५७ हजार दोनशेहे  रूपयांची मुद्देमालासह दारू जप्त केली. या प्रकरणी सुनिल राजाराम घोरपडे (वय वर्ष ४५, रा.अडकूर ता. चंदगड जि. कोल्हापूर) या युवकाला अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या गडहिंग्लज विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

     सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. याच संधीचा फायदा घेऊन चंदगड तालुक्यातील अडकूर भागात गोव्यावरून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होणार असल्याची खबर मिळाल्याने गडहिंग्लज उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार अडकूर-इब्राहिमपूर रस्त्यावर अडकूर नजिक वाहनांची तपासणी केली असता टाटा कंपनीच्या टाटा  सुमो गोल्ड गाडीत गोवा बनावटीच्या मद्याच्या  एकूण ७५० मिलीच्या ४९२ सिलबंद बाटल्या व १८० मिलीच्या १६० सिलबंद बाटल्या मिळून आल्या. यामध्ये वाहनचालक सुनिल राजाराम घोरपडे यास अटक करण्यात आली आहे. कारवाईत सदर वाहन व मद्यासह एकूण ५.५७.२०० इतक्या किंमतीचा मुद्देमाल जागीच जप्त केला.

    राज्य उत्पादन शुल्क चे कोल्हापूर अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या आदेशानुसार जिल्हयात सातत्याने अवैद्य मद्य विक्रीबाबत छापे सत्र सुरु आहेत. त्यानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गडहिंग्लज कार्यालयाने सदर कारवाई केली. गडहिंग्लजचे निरीक्षक सचिन गो. भवड, उपनिरीक्षक किरण आ. पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक चंदगड, नरेश. एस. केरकर, जवान संदिप डी. जानकर, भरत. ए. सावंत, संदिप. बी. चौगुले यांनी केली. अधिक तपास निरीक्षक सचिन गो. भवड (गडहिंग्लज) करत आहेत.

No comments:

Post a Comment