तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
येथूनच जवळ असणाऱ्या हडलगे (ता गडहिंग्लज) येथे शिवप्रतिष्टान हिंदूस्थान मार्फत दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. दौडचे पहिलेच वर्ष असले तरी या दौडमध्ये गावातील सर्व युवक युवतीबरोबरच अबाल वृद्ध पण सहभागी होत असल्याने प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
हडलगे येथे प्रथमच दौडचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी गावातील सर्व युवक व जेष्ठ व्यक्तिनी एकत्र येऊन अतिषय उत्तम रित्या दौडचे आयोजन केले आहे. सकाळी ५ वाजता शिव प्रतिमेचे पूजा करून प्रेरणा मंत्र म्हणत ही दौड हि दौड गावलगत असणाऱ्या श्री भावेश्वरी मंदिर, गोठणा वरील श्री गणेश मंदिर असा प्रवास करत गावातील सर्व गल्या मधून ही दौड धावत राहते. हातात भव्य भगवा ध्वज, तरुणींच्या हातात तळपत्या तलवारी, सर्व धारकऱ्यांचे एकसारखे पांढरे गणवेश, डोक्यावर फेटा. कमरेला शेला अन मुखामध्ये देशभक्ती गाण्यांचा व घोषणांचा जल्लोष. जय भवानी जय शिवराय, देशासाठी जगायचं रं, आम्ही गड्या डोंगरच राहाणारं, दुनिया चले ना चले, मर्द आम्ही हिंदू खरे, धमक धमक घुंसा बोले अशी तालासुरात गाणी म्हणत ही दौड सकाळच्या धुक्यातून धावताना संपूर्ण हडलगे गावात प्रेरणादायी वातावरण निर्माण करत आहे.
गावातील सर्व गल्या रांगोळीचा सडा टाकून व फुलांची उधळण करून सजवल्या जात आहेत. ठिक ठिकाणी या दौडचे स्वागत आरती ओवाळून केले जात आहे. विशेषतः दौडमध्ये पुरुष व महिला वर्गही आनंदाने सहभागी होत असल्याने एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. टिव्ही मोबाईल च्या या जमान्यात आध्यात्मापासून दूर जाणाऱ्या या आधुनिक पिढीला या दौडने एकत्र आणले आहे. एकंदरीत या दौड मधील गीतांनी परिसर दुमदुमत असून त्याचा आवाज तेऊरवाडी, डोणेवाडी, तारेवाडी आदि गावामधे धुमत आहे.
No comments:
Post a Comment