महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गायीच्या दूध दर कपाती विरोधात गोकुळ दूध संघाच्या बिद्री चिलींग सेंटर येथे जोरदार आंदोलन केले होते. यावेळी मनसेच्या सहा पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना अटक केली होती. या सर्व आंदोलकांनी पुणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन आंदोलना बाबत सविस्तर माहिती दिली. आपण लाखो शेतकऱ्यांच्या उदर निर्वाहाचं साधन असलेल्या दूध व्यवसायात झालेल्या दर कपात यामध्ये लक्ष घालून दूध उत्पादकांना दिलासा द्यावा असे निवेदन यावेळी देण्यात आले. त्याच बरोबर पुढील आंदोलना बाबत चर्चा ही करण्यात आली.
अटक झालेल्या आंदोलनकर्त्यांची विचारपूस करत सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना राजसाहेबांनी कौतुकाची थाप दिली. यावेळी कोल्हापूर लोकसभा संघटक बाळा शेडगे, कोल्हापूर जिल्हा संपर्कध्यक्ष जयराज लांडगे, कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, उपजिल्हाध्यक्ष रोहन निर्मळ, लोकसभा सह संघटक प्रशांत मते, लोकसभा सहसंघटक नरेंद्र तांबोळी, लोकसभा सहसंघटक वैभव माळवे, राधानगरी भुदरगड विधानसभा संघटक युवराज येडुरे, कागल तालुका अध्यक्ष विनायक आवळे, तालुका संघटक प्रविण मनगुडे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष शिवतेज विभूते, सौरभ कांबळे, डॉ. सतीश खोत, अभिजीत कीर्तीकर निखिल परीट, विनायक सूळकुडे, अमित कोरे, सुरज वरोटे, रणजित पाटील विनायक सोळकुडे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment