महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये गरबा उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

21 October 2023

महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये गरबा उत्साहात

  


चंदगड / प्रतिनिधी

     तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॅम्पस मध्ये गरबा नाईट कार्यक्रम द रॉयल्स क्लब व लायन्स कंपनीच्या सहकार्याने  उत्साहात संपन्न झाला. संस्थाध्यक्ष महादेव वांद्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमासाठी उपस्थित बी. एड. विभागाचे विभाग प्रमुख प्रा. ग. गो. प्रधान यांनी भारत हा विविधतेत एकता असणारा देश आहे.

    त्यामुळे आपली संस्कृती ही देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात त्यापैकीच हा एक उत्सव म्हणजे दसरा महोत्सव होय या दसरा सणाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना गरबा नृत्य प्रत्यक्ष पाहता यावे यामध्ये भाग घेऊन त्याचा आनंद घेता यावा एकमेकांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लागावी व पुस्तकी ज्ञानाबरोबरच विविध कलागुणातून त्यांना आपला व्यक्तिमत्व विकास करता यावा असे प्रतिपादन त्यांनी केले.

     सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रमुख पाहुणे शिवाजीराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व असा कार्यक्रम ठेवल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुकही केले व शुभेच्छा दिल्या. महादेव वांद्रे यांनी अतिशय शांततापूर्ण व एकमेकांच्या सहकार्याने कार्यक्रम पूर्ण करावा व आपली कला प्रदर्शित करावी असे सांगून सर्वांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

  ‌      या कार्यक्रमांमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता त्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे शिवाजीराव पाटील  यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी सौ मृणालिनी वांद्रे, प्राचार्य डॉ. एम. सी. महांतेश, एस. पी. गावडे, प्रा. ओमकार जाधव, प्रा. विनायक यादव, प्रा. ए. एस. पोतदार यासह प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पृथ्वीराज वांद्रे व सूत्रसंचालन श्रीशैल पाटील यांनी केले तर आभार श्रीनिवास पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment