कोल्हापूर येथे रविवारी लोकराजाराजर्षी शाहू गौरव पुरस्कारांचे वितरण,छत्रपती संभीजीराजे यांची प्रमुख उपस्थिती, अन्वेषण ग्रुप ऑफ मिडियाचा पुढाकार - चंदगड लाईव्ह न्युज

21 October 2023

कोल्हापूर येथे रविवारी लोकराजाराजर्षी शाहू गौरव पुरस्कारांचे वितरण,छत्रपती संभीजीराजे यांची प्रमुख उपस्थिती, अन्वेषण ग्रुप ऑफ मिडियाचा पुढाकार

 


चंदगड / प्रतिनिधी 

             अन्वेषण ग्रुप ऑफ मिडियाच्या वतीने लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी उल्लेखनीय व कौतुकास्पद कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील महनीय व्यक्तींना राज्यस्तरीय ’लोकराजाराजर्षी शाहू गौरव पुरस्कार २०२३’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा रविवार दि.२२ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती अन्वेषण ग्रुप ऑफ मिडिया संस्थेचे संचालक तथा संपादक डॉ. सुभाष सामंत यांनी प्रसिद्धिपत्राव्दारे दिली आहे.

      माजी खासदार संभाजीराजे छत्रपती अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.तसेच या समारंभास खासदार धैर्यशील माने, माजी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार श्रीमती जयश्री जाधव, आमदार प्रकाशराव आबीटकर, गोकूळचे संचालक माजी आमदार डॉ. सुजितमिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके व शाहू वाडी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी जयकुमार सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडणार आहे. तसेच प्रसिध्द व्याख्याते, पत्रकार आणि माहिती अधिकार क्षेत्रातील जाणकार शाहीन शेख यांचे ‘बदलती पत्रकारिता आणि समाज’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ्यात जगन्नाथ शंकर साळुंखे (प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर), सौ. अनिता शंकर देशमुख-भूतल (तहसिलदार राधानगरी), श्रीमती कल्पना ढवळे भंडारे (तहसिलदार हातकणंगले), दिलीपकुमार काळे (दुय्यम निबंधक, हातकणंगले), प्रमोद चंद्रकांत वाघ (पोलीस उपनिरीक्षक), सुधाकर देवाप्पा मणेरे (सहकार, इचलकरंजी), डॉ. ख्वाजा मैनुद्दीनमुजावर (प्रसिध्द धन्वंतरी नेसरी), बळीराम यशवंत पाटील (प्रगतशील शेतकरी), जितेंद्र श्रीपती कांबळे (सामाजिक, गडहिंग्लज), सौ. अरिता मोहन जाधव (सामाजिक कार्यकर्त्या, कुंभोज), सौ. सुरेखा शाहीन शेख (सामाजिक, सांगली), सौ. गितांजली हेमंतकुमार सुतार (आरोग्यसेविका, गडहिंग्लज), जीवन सिताराम बोकडे (आरोग्य सहाय्यक, आजरा), सौ. सुमन हंबीरराव मोहिते (आरोग्यसेविका, आजरा), राजाराम पांडूरंग पोतनिस (सामाजिक व राजकीय, आजरा), संजय पांडूरंग कांबळे (सामाजिक आणि राजकीय), दिपक बापूराव जाधव (पत्रकार, धुळे), संजय ज्ञानू कांबळे (सामाजिक, राधानगरी), चंद्रकांत दगडू कदम (सामाजिक, शाहूवाडी), जयवंत शामरावजाधव (सामाजिक, इस्लामपूर) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सौ. अर्चना सुभाष सामंत, उपसंपादक अन्वेषण ग्रुप ऑफ मिडिया यांच्यासह ग्रुपचे तातोबा गावडा, राजाराम कांबळे, निवास चौगले, मारुती गायकवाड, संतोष कांबळे, भारत जमणे, रत्नदिप घोलप, प्रशांत कांबळे, प्रणव कुलकर्णी, संदिप दाभाडे, रविकिरण बळे,अरविंद पाटील, अब्दुल नदाफ, शिवाजी नाईक, संतोष गोते, सुभाष आरबुणे, मल्हारी सासणे, विश्वास वडाम, दिपक कोष्टी यांच्यासह अन्वेषण टिम सोहळ्याच्या यशासाठी प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment