लाकुरवाडी येथे ग्रामपंचायतीच्या मतदार यादीतून ६ मतदारांची नावेच गायब - चंदगड लाईव्ह न्युज

21 October 2023

लाकुरवाडी येथे ग्रामपंचायतीच्या मतदार यादीतून ६ मतदारांची नावेच गायब

 


चंदगड / प्रतिनिधी 

      लाकुरवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार यादीतून हयात असताना सहा मतदारांची नावेच कमी करण्यात आली आहेत. ती नावे पुर्ववत मतदार यादीत समाविष्ट करावीत अशी मागणी बाबु राजगोळकर यांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

      लाकुरवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेली भाग क्रमांक २४३, प्रभाग क्रमांक १ मध्ये हयात असलेल्या बाळु मारूती राजगोळकर, सागर मारूती राजगोळकर, जगंलू गोपाळ राजगोळकर, दीपक जंगलू राजगोळकर, यशोदा जंगलू राजगोळकर, सरिता राजाराम बुच्चे या सहा मतदारांची नावेच यादीतून गायब झाली आहेत, त्यामुळे या नागरिकांना नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे या मतदारांची नावे मतदार यादीत पूर्ववत समाविष्ट करून ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याची संधी द्यावी अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment