जेलूगडे येथे नवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

21 October 2023

जेलूगडे येथे नवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

  


चंदगड / प्रतिनिधी 

      जेलूगडे (ता. चंदगड) येथे नवरात्री निमित्त श्री सातेरी भावई देवी नवरात्र मंडळाच्या  वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

       यावेळी सासू सुनेचे मन एका प्रेमळ धाग्यात बांधण्याचा प्रयत्न गळाभेट घेऊन नमस्कार करणे, उखाणे घेणे, लिंबू चमचा, तळ्यात मळ्यात,बेडूक उड्या, शालेय मुला मुलींना सामान्य ज्ञानाची माहिती, विविध खेळांचे आयोजन करण्यात आले तसेच विविध खेळात विजेत्या महिलेला पैठणी साडी बक्षिस म्हणून देण्यात येणार असून या मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबरच ग्रुपच्या माध्यमातून नऊ दिवस नऊ वेगवेगळे उपक्रम दत्ता चव्हाण, राजू गावडे, नंदू गावडे, यशवंत गावडे, नितू गावडे, दौलत प्रधान, श्रीधर गावडे यांनी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले. कवी दशरथ (आण्णा) कांबळे पाटील यांनी तांत्रिक, मांत्रिक, भोंदू बाबा आपल्याला कशा प्रकारे फसवतात याची प्रात्यक्षिके प्रत्यक्ष करून दाखवत अशा लोकांना बळी न पडण्याचे आवाहन केले.No comments:

Post a Comment