कोवाडचे महिला मंडळ कोल्हापूर येथील झिम्मा फुगडी स्पर्धेत तृतीय - चंदगड लाईव्ह न्युज

22 October 2023

कोवाडचे महिला मंडळ कोल्हापूर येथील झिम्मा फुगडी स्पर्धेत तृतीय


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
      धनंजय महाडिक युवाशक्ती व महिला आघाडी संलग्न भागीरथी महिला संस्था कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय झिम्मा फुगडी स्पर्धा नुकत्याच कावळा नाका कोल्हापूर येथे पार पडल्या. या स्पर्धेत चंदगड तालुक्यातील वांद्रे गल्ली कोवाड येथील महिला मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या महिला मंडळाला अरुंधती महाडिक व मान्यवरांच्या हस्ते १५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी धनंजय महाडिक युवा शक्तीचे चंदगड तालुकाध्यक्ष मायाप्पा पाटील उपस्थित होते.

   काळाच्या ओघात लोप पावत चाललेला झिम्मा फुगडी हा खेळ कोवाड येथील महिलांनी जतन करून तो वाढवला आहे. ही अनुकरणीय व कौतुकास्पद बाब आहे. या स्पर्धेत मीरा वांद्रे, राणी बागडी, लक्ष्मी वांद्रे, सुवर्णा कुंभार, उज्वला वांद्रे, माधुरी वांद्रे, रोहिणी मनवाडकर, मनीषा चोपडे, माधुरी स. वांद्रे, संगीता आडाव, आनंदी वांद्रे, सुशीला पवार, अनिता वांद्रे, कमल परीट यांनी सहभाग घेतला. सुनील पाटील यांनी उत्कृष्ट ढोलकी वादनाने साथ दिली.

No comments:

Post a Comment