चंदगड / सी. एल वृत्तसेवा
आयुष्यमान भारत अंतर्गत चंदगड येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे आरोग्य भारती संस्थेमार्फत आरोग्य शिबिर रविवारी २२ ऑक्टोबर २०२३ रोजी घेण्यात आले. संस्थेचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अश्विनी माळकर यांनी आरोग्याचे महत्त्व सर्वांना पटवून सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते सुनीलदादा काणेकर चंदगड यथील आरोग्य शिबीराचे नियोजन केले होते. या शिबिरामध्ये ६५ मुले व ५० महिलांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमासाठी डॉ. रोहित दिक्षित, डॉ. अरुण पवार, वसंत पाष्टे, बाबुराव बल्लाळ, भास्करजी कामत, मधुकर देसाई, सीमा माने, पूजा तुपारी व अमेय सबनीस उपस्थित होते. शिबीरात सर्वांना आवश्यक औषधी मोफत देण्यात आली. शिबीरामध्ये सहभागी सर्वांचे समाजसेवक सुनिलदादा काणेकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment