जनतेच्या समस्यांसाठी, मनसेची हेल्पलाईन.......काय आहे हि हेल्पलाईन........वाचा..... - चंदगड लाईव्ह न्युज

23 October 2023

जनतेच्या समस्यांसाठी, मनसेची हेल्पलाईन.......काय आहे हि हेल्पलाईन........वाचा.....


कोल्हापूर / सी. एल. वृत्तसेवा

        जनतेच्या समस्या एका हक्काच्या व्यासपीठावर मांडता याव्यात आणि त्यातून योग्य तो न्याय मिळावा अशी माफक अपेक्षा सर्व सामान्य नागरिकांची असते. हीच नस पकडत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर ग्रामीण जिल्हया यांच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. पुणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते या हेल्पलाईन 7030309799 नंबरची सुरवात करण्यात आली. 

        कागल विधानसभा, चंदगड विधानसभा आणि राधानगरी विधानसभा या तीन विधानसभेतील नागरिकांना या हेल्पलाईचा लाभ मिळणार आहे. शासकीय, निम्मशासकीय ऑफिसेस इथे काम होण्यास येणाऱ्या अडचणी तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरामधील समाजाला होणारा त्रास मांडण्यासाठी ह्या हेल्पलाईनचा उपयोग होणार आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मनसेची एक टीम ह्यावरती काम करणार असून आलेल्या तक्रारीच पूर्ण निरसन असा प्रयत्न केला जाणार आहे.

       यावेळी कोल्हापूर लोकसभा संघटक बाळा शेडगे, कोल्हापूर जिल्हा संपर्कध्यक्ष जयराज लांडगे, कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, उपजिल्हाध्यक्ष रोहन निर्मळ, लोकसभा सह संघटक प्रशांत मते लोकसभा सहसंघटक नरेंद्र तांबोळी लोकसभा सहसंघटक वैभव माळवे, राधानगरी भुदरगड विधानसभा संघटक युवराज येडुरे, कागल तालुका अध्यक्ष विनायक आवळे, तालुका संघटक प्रविण मनगुडे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष शिवतेज विभूते, सौरभ कांबळे, डॉ. सतीश खोत अभिजीत कीर्तीकर निखिल परीट, विनायक सूळकुडे, अमित कोरे, सुरज वरोटे, रणजित पाटील विनायक सोळकुडे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment