चंदगड : बुलडाणा अर्बनने मयत कर्जदाराच्या कुटुंबियांना दिला दिलासा - चंदगड लाईव्ह न्युज

23 October 2023

चंदगड : बुलडाणा अर्बनने मयत कर्जदाराच्या कुटुंबियांना दिला दिलासा

वारसदार श्रीमती सुरेखा भगवंत गावडे यांना अपघाती विमा रकमेचा धनादेश वितरण करताना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे व उपस्थित मान्यवर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        सहकाराची समृध्द परंपरा जतन करण्याबरोबरच सहकाराला सामजिक कार्याची जोड देऊन समाजातील सर्व घटकांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या बुलडाणा अर्बन संस्थेच्या वतीने ठेवीदाराला ठेवी रकमेएवढे व कर्जदारास कर्ज रकमेएवढे अपघाती विमा संरक्षण देण्यात येते. कोल्हापूर विभागातील शाखा चंदगडचे मयत सोनेतारण कर्जदार कै. भगवंत विष्णु गावडे (रा. कोनेवाडी, ता. चंदगड) यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांचे शाखेत सोनेतारण कर्ज असून त्यांची वारसदार पत्नी श्रीमती सुरेखा भगवंत गावडे यांना संस्थेच्या सभासदांकरीता असलेल्या अपघाती विमा संरक्षण योजने अंतर्गत विमा रक्कम रू. १,३३,४५२/- इतक्या धनादेशाचे वितरण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांचे हस्ते करण्यात आले.

        याप्रसंगी माजी रो.ह.यो. राज्यमंत्री भरमू सुबराव पाटील, चंदगडचे माजी जि. प. सदस्य व्हि. एस. वाली, बाळासाहेब घोडगे, राजेंद्र परीट, सचिन बल्लाळ, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उदयकुमार देशपांडे, चंदगड अर्बन बँकेचे संचालक सुनिल काणेकर, विवेक बल्लाळ, प्रा. एस. एन. पाटील, सदानंद भोसले, जनता पतसंस्थेचे मॅनेजर असलम तगारे, तुकाराम पाटील, भरमू घोळसे, सुभाष जाधव, कोल्हापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक गुरूनाथ लोखंडे, चंदगड शाखेचे शाखा व्यवस्थापक अवधूत यादव तसेच शाखेतील कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment