किणीच्या वेदांती मणगुतकर ची राज्य व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड - चंदगड लाईव्ह न्युज

23 October 2023

किणीच्या वेदांती मणगुतकर ची राज्य व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

 


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

      किणी (ता. चंदगड) येथील जयप्रकाश विद्यालयाची विद्यार्थिनी कु. वेदांती बाळाराम मणगुतकर हिची ३ किलोमीटर चालणे क्रीडा प्रकारात राज्य व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

      जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे पार पडलेल्या विभागीय शालेय १७ वर्षे वयोगटाखालील स्पर्धेत तिने या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. ती जयप्रकाश विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत आहे. तिची चंद्रपूर येथे २९,३०,३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्य स्तरीय तसेच चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ही तिची निवड झाली आहे. तीने राजस्थान येथील जोधपूर येथे नुकत्याच झालेल्या वेस्ट झोन स्पर्धेत तिने चतुर्थ क्रमांक पटकावला. या यशाबद्दल तिचे संस्था पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने गावात  जल्लोषात सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment