चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथील दुर्गामाता मंडळाने नवरात्रीचे औचित्य साधून केंद्रीय प्राथमिक शाळेला शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. दररोज वेगवेगळे प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून मंडळ सामाजिक बांधिलकी जपत आहे.
यावर्षीही धार्मिक सांस्कृतिक परंपरा जपताना एक विधायक कार्य म्हणून इ.१ ली. ७ वी च्या केंद्रीय प्राथ शाळेतील १७० विद्यार्थ्यांना सकाळच्या आरतीला बोलावून वह्या, पेन, आदी शैक्षणिक साहित्य मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, कार्यकर्ते व पुरोहित राजेश कुलकर्णी यांच्या उपस्थित वाटप केले. विद्यार्थ्याना शिक्षणास मदत व्हावी म्हणून साहित्य पुरविल्या बद्दल त्या मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी शिक्षकवर्ग ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment