कागणी : मंडळाचे सदस्य कृष्णा सुळेभावकर यांच्याकडे दागिना सुपूर्द करताना हणमंत पाटील. शेजारी जनार्दन देसाई अमृत देसाई
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
दुर्गामाता उत्सव मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावेत यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, सर्वच दुर्गामाता उत्सव मंडळांनी विधायक उपक्रमांना प्राधान्य द्यावे. यासाठी संपूर्ण गावाला सहभागी करून गावची एकी कायम ठेवा, असे आवाहन कोवाड येथील सराफ व्यावसायिक हणमंत पाटील यांनी व्यक्त केले.
चंदगड व कोवाड (ता. चंदगड) येथील शिवाजीराव ज्वेलर्सच्या पुढाकाराने दरवर्षी विविध उत्सवामध्ये उपक्रम राबवले जातात. यंदा गणेशोत्सवात कोवाड, कुदनुर, नेसरी व बेकिनकेरे परिसरातील वीस हुन अधिक मंडळांना दहा ग्रॅम चांदीचा दागिना भेट दिला आहे. यानंतर नवरात्र उत्सवामध्येही नेसरी येथे दोन तर कागणी व कालकुंद्री येथील प्रत्येकी एका मंडळाला चांदीचा दागिना भेट म्हणून दिला. कागणी ( ता. चंदगड) येथे नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मंडळाचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते जनार्दन देसाई, कृष्णा सुळेभावकर, पोलीस पाटील अमृत देसाई, श्रीकांत सुळेभावकर, श्रीकांत तारिहाळकर, सी. जे. देसाई उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा सुळेभावकर म्हणाले शिवाजीराव ज्वेलर्स केवळ व्यवसाय एके व्यवसाय न करता सामाजिक जबाबदारीचे भान ओळखून सामाजिक उपक्रम राबवत आहे. त्यांचे उपक्रम कौतुकास्पद आहेत.
No comments:
Post a Comment