चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
येथील दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये १५ ऑक्टोबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती , थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी डॉ. ए. पी. जे. कलाम व ग्रंथशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्य एन. डी. देवळे यांनी केले. प्रास्ताविक टी. टी. बेरडे यांनी केले. दि न्यू इंग्लिश स्कूलचे उपक्रमशील ग्रंथपाल शरद हदगल यांनी ग्रंथालयातील दहा हजार पुस्तकांचे वाचन प्रेरणा दिनानिमित्त सात दिवस ग्रंथोत्सवाचे आयोजन केले होते. दररोज एका साहित्य प्रकाराचे पुस्तक प्रकाशन मांडले.
यावेळी ग्रंथपाल ग्रंथपाल शरद हदगल यांनी वाचन चळवळ वाढविण्यासाठी विद्यार्थ्यासाठी पुस्तक वाचून अभिप्राय लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिस योजना जाहिर केली. यावेळी विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांच्या सोळा पुस्तकांचे स्वतंत्र ग्रंथदालन भरविले होते. आपल्या शिक्षकाची पुस्तके पाहून मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद वाटत होता. कु. संगीता यमकर, सुकन्या आनंदाचे , धनंजय गावडे या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी टी. एस. चांदेकर म्हणाले की, "वाचन करणारी माणसं मनाने,विचाराने,आणि कृतीनेही श्रीमंत होतात. एक पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं, एक पान एखाद्याचे भविष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं एवढी ताकद वाचनात आहे .तेव्हा रोज एक तरी पान वाचत जाणे ही काळाची गरज आहे."
"माणूस फक्त दोन गोष्टीतून शिकू शकतो एक म्हणजे वाचन करून आणि दुसरं म्हणजे हुशार माणसाच्या सहवासातून." असे मत जे. जी. पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाला पुष्पा सुतार, एम. व्ही. कानूरकर, व्ही. के. गावडे, व्ही. टी. पाटील, टी. व्ही. खंदाळे, एस. जी. साबळे, डी. जी. पाटील, एस. जे. शिंदे, सूरज तुपारे, रवी कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. आर. चिगरे तर आभार पुंडलिक गावडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment