![]() |
जोतिबा शंकर बामणे |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कुदनुर (ता. चंदगड) येथील श्री सिद्धेश्वर मंदिर लगतच्या तलावात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना काल शनिवार दि. १४ रोजी घडली. जोतिबा शंकर बामणे (वय ६९) असे मयताचे नाव असून तो कुदनूर येथील रहिवासी होता. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे.
पोलीस व घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी, शुक्रवार दि. १३ रोजी जोतिबा बामणे हा आपल्या पट्टी नावाच्या शेताकडे जाण्यासाठी निघाला होता. त्याला डोळ्यांनी अंधुक दिसत असल्याने तळ्याच्या काठावरून जाताना पाय घसरून तो तलावात पडून बुडाला असावा. असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची वर्दी धोंडीबा जोतिबा बामणे यांनी पोलिसांत दिली. शनिवारी या व्यक्तीचे प्रेत तलावातील पाण्यावर तरंगताना मंदिर परिसरात फिरण्यास गेलेल्या लोकांना आढळले. घटनेचा अधिक तपास कोवाड पोलीस ठाणे अंमलदार जमील मकानदार करत आहेत.
No comments:
Post a Comment