वयाचा अहंकार बाजूला ठेवून बाल मानसिकतेतून जीवनाचा आनंद घ्या - सहनिबंधक अरूण काकडे, कोल्हापूर येथे चंदगड वासियांचा स्नेह मेळावा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2023

वयाचा अहंकार बाजूला ठेवून बाल मानसिकतेतून जीवनाचा आनंद घ्या - सहनिबंधक अरूण काकडे, कोल्हापूर येथे चंदगड वासियांचा स्नेह मेळावा संपन्न

चंदगड वासियांचा स्नेह मेळाव्यात बोलताना सहनिबंधक अरूण काकडे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

     समाजामध्ये मैत्री, स्नेहबंध दुरावत चाललेत. एकमेकांमध्ये मिसळणे, संवादी होणे, ही सामाजिक गरज आहे. वयाचा अहंकार बाजूला ठेवून बाल मानसिकतेतून जीवनाचा आनंद घ्यावा. माणसांमध्ये विश्वास आणि प्रामाणिकपणा कमी होत चाललाय. चांगल्या उद्दिष्टांसाठी सकारात्मकतेनं काम करा. राजकीय आणि सामाजिक सहकार्यातून सामाजिक प्रश्न सोडवणं शक्य आहे. एकमेकांना सहाय्य करून आनंदी जीवनाचा पाया घालता येतो. सुदृढ समाज निर्मितीसाठी पूर्वीचा विश्वास आणि प्रामाणिकपणा पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नवनवीन अधिकारी निर्माण करून चंदगडच्या नावलौकिकात भर घालूया, असे प्रतिपादन सहकारचे विभागिय सहनिबंधक अरूण काकडे यांनी केले.

        ते शाहूपुरी मधील महालक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे चंदगड तालुका मित्र मंडळ आणि पद्मश्री रणजित देसाई सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापुरातील चंदगडवासीयांचा ‘चंदगडी स्नेहमेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योगपती जे. बी. बाचुळकर होते. प्रारंभी प्राचार्य डाॅ. गोपाळराव गावडे यांनी केले. महाराष्ट्र केसरी विजेते पै. विष्णू जोशीलकर यांनी चंदगडी स्नेहमेळाव्याचं महत्व सांगून कोल्हापुरातील सर्व चंदगडवासियांनी संघटीत होवुन नवीन चांगलं काहीतरी घडवण्यासाठी काम करू असं सांगितलं.

    यावेळी पै.विष्णू जोशीलकर, कोल्हापूर शहर वाहतूक निरीक्षण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, शास्त्रज्ञ निलेश तरवाळ, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. प्रकाश दुकळे, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे सचिव प्रा. डॉ. महंतेश हिरेमठ, शाहू पुरस्कार विजेते सुबराव पवार, सेंद्रिय शेतीमध्ये गुंठ्याला अठ्ठ्यान्नव किलो असं विक्रमी उत्पन्न घेणारे उत्तम राजाराम पाटील (रामपूर), ४०० मी धावणे राज्यात पहिली आलेली मधुरा तुषार बिर्जे , पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवर २०० मी व ४०० मि. धावणे स्पर्धेत व्दितीय आलेला प्रतीक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तर प्राचार्य मोहन बांदिवडेकर, सुबराव पोवार, प्रा. डॉ. कल्पना पाटोळे, प्रा. जॉर्ज क्रुझ, सुभाष देसाई यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला उत्तम पाटील, अरुण आपके, सुभाष देसाई, एम. आर. पाटील, संजय गावडे, ज्ञानेश्वर गावडे, संभाजी सावंत, घनश्याम पाटील, नामदेव निट्टूरकर, पांडुरंग सावंत यासह चंदगडवासीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आभार प्रा. जॉर्ज क्रुझ यांनी मानले.

No comments:

Post a Comment