लकिकट्टे येथे ग्रामस्थांकडून स्वच्छता अभियान - चंदगड लाईव्ह न्युज

05 October 2023

लकिकट्टे येथे ग्रामस्थांकडून स्वच्छता अभियान

 

लकिकट्टे येथे ग्रामस्थांकडून स्वच्छता अभियान

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         लकिकट्टे (ता. चंदगड) येथे दि. १ रोजी स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात ग्रामस्थांनी स्वेच्छेने भाग घेऊन गावातील स्वच्छतेला प्राधान्य दिले.

       माजी सभापती बंडू मिनाप्पा चिगरे, सरपंच संजीवनी संदिप पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजाराम रामचंद्र भिंबर व भिमराव कांबळे व परशराम भिंबर समाजसेवक अनिल कांबळे, पांडूरंग धुमाळे, पोलीस पाटील दयानंद कांबळे, विष्णू धुमाळे, अंगणवाडी सेविका सुनिता सन्नाप्पा किल्लेदार व सरीता दिपक बुरुड तसेच मदतनीस लिलावती भरत रेडेकर व स्मीता सिताराम पाटील गामसेवक अनिता कटारे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी भाग घेतला. 

No comments:

Post a Comment