चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
विमा प्रतिनिधी परशराम पुंडलिक गावडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्य गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू व गरजू विद्यार्थ्यांला शालेय वार्षिक फी जमा केली. सुळये येथील माने कुटुंब यांना जीवनावश्यक वस्तू देवून मदत केली.
सुळये येथील नागोजी माने या कुटुंबावर कर्ता पुरुष अचानक गेल्यामुळे त्यांच्यावर मृत्यूचा डोंगर कोसळला होता. हे कुटुंब झोपडीत राहत असून झोपडीला फाटलेले ताटुक बांधून राहत आहेत. पुरुष गेल्याने परिस्थिती बिकट आहे. पत्नी, दोन मुले व वयोवृध्द आई यांच्यावर वाईट परिस्थिती ओढवली आहे. अशा परिस्थितीची माहिती सी. एल. न्युजच्या बातमीदारांना समजल्यानंतर त्यांनी या सद्यस्थितीचा व्हीडीओ बातमी केली. याची दखल घेवून समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांना मदत केली आहे. मदत कमी पडत असल्याने आजही त्यांचे घर उभे राहू शकले नाही. अशा पध्दतीने समाजातील लोकांच्याकडून मदत मिळाल्यास त्याचे घर उभे राहू शकेल.
वीमा प्रतिनिधी परशराम गावडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त माने कुटुंबियांना मदतीचा आधार दिला. श्री. गावडे यांनी याचबरोबर कानडी गावातील अनिता कांबळे व सुळये येथील प्रणय पिरणकर याला वार्षिक फी ची मदत दिली.
1 comment:
Esh
Post a Comment