चंदगड पोलीस ठाण्यातील हवालदार राजीव जाधव लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात - चंदगड लाईव्ह न्युज

06 October 2023

चंदगड पोलीस ठाण्यातील हवालदार राजीव जाधव लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

 

राजीव जाधव

नंदकुमार ढेरे / चंदगड - प्रतिनिधी

      गुन्ह्यात अटकेची कारवाई टाळण्यासाठी वाढीव कलम न लावता तपासात मदत करण्यासाठी ५ हजारांची लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून शुकवारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पोलिस हवालदार राजीव शामराव जाधव (वय ४४, रा‌. गडहिंग्लज) याला अटक केली आहे.

     अधिक माहिती अशी की, एका प्रकरणात फिर्यादीविरुध्द चंदगड पोलिसात गुन्हा दाखल आहे. त्याला चंदगड पोलिस ठाण्यात बोलावून नोटीस देताना गुन्ह्यात अटकेची कारवाई नको असेल व वाढीव कलम न लावता तपासात मदत हवी असल्यास ५ हजार द्या. अशी मागणी जाधव याने फिर्यादीकडे केली. याबाबतची फिर्यादीच्या तक्रारीवरून शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंचासमक्ष लाच रकमेची पडताळणी केली असता पदाचा दुरुपयोग करून तडजोड करून ४ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जाधव विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उप अधीक्षक सरदार नाळे, पोसई संदीप बंबरगेकर, पोना संदीप काशिद, रुपेश माने, उदय पाटील, सूरज अपराध यांनी केली.‌

           भ्रष्ट अधिकारी लाचलुचपतच्या रडारवर 

       चंदगड तालुक्यातील महसूल,पोलीस, भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक, पुरवठा आदी खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून सामन्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात लुट सुरू आहे.मागील आठवडय़ात पाणी पुरवठा विभागाच उप अभियंता श्रीमती काबंळे यांनाही लाच स्वीकारताना लाचलुचपत रंगेहात पकडले. चंदगड तालुक्यातील साध्याभोळ्या नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या आणखी दोन खात्यातील अधिकारी, कर्मचारी लाचलुचपतच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.

         लाचलुचपत विभागाचे  नागरिकांना आवाहन

     चंदगड तालुका हा जिल्हा अंतरापासून १२५ कि.मी दूर आहे. त्यामुळे येथील नागरिकांची लूट केली तरी आपल्यावर काही कारवाई होणार नाही. असा अविर्भावात येथील सर्वच खातेप्रमुख असून यांच्याकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट सूरू आहे. त्यामुळे कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांची माहीती लाचलुचपत विभागाला द्यावी असे आवाहन पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment